Accountant

Website Arihant Corporation

Textile Manufacturer

अकौंटंट

अरिहंत कॉर्पोरेशन इचलकरंजी मधील अग्रगण्य टेक्सटाईल उत्पादक कंपनी आहे. आम्ही मुख्यत: कॉटन साड्या, रुमाल व धोती चे उत्पादन करतो. आमच्या टीम मध्ये जोडण्यासाठी आम्ही सध्या एक पात्र अकौंटंट शोधत आहे. उम्मेदवार हा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये निपुण असावा, आणि त्याला किमान ३ वर्षांचा ‘बीजी’ Busy  या अकौटिंग सोफ्टवेअर मध्ये अनुभव असावा. सदर पदासाठी कार्यस्थळ हे 8/804, अरिहंत मनोर, शांतिनगर, इचलकरंजी असेल.

कार्यकाळ:

या पदासाठी कार्यकाळ खालीलप्रमाणे असेल:

सोमवार ते शनिवार: सकाळी 9:00 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 3:00 ते रात्री 8:30.

रविवार: विराम. (कधीतरी जर खूप काम बाकी असेल तर आम्ही अर्धा दिवस कार्यकाळ ठेवू शकतो.)

💰 वेतन (Salary):

  • ₹20,000 से ₹35,000 प्रति माह

  • वेतन कौशल, अनुभव और कार्यक्षमता के आधार पर तय किया जाएगा

  • इंटर्नशिप / प्रशिक्षण अवधि के दौरान वेतन कम हो सकता है, जिसे कन्फर्मेशन के बाद संशोधित किया जाएगा

कामाचे विवरण / जबाबदारी:

  1. वित्तीय व्यवहार संदर्भात : सर्व वित्तीय घेवाण देवाणी ची अचूक नोंद ठेवणे आणि कंपनीच्या धोरणांनुसार बीजी सोफ्टवेअर मध्ये सर्व एन्ट्री करणे.
  2. मालाच्या व्यवहार संदर्भात : सप्लायर / कारखानदार कडून आलेले ग्रे कापड, प्रोसेसमधून परत आलेल्या मालाचा पूर्ण अहवाल, वेळोवेळी रिपोर्ट मध्ये भरणें. मालाची सर्व प्रकारची आवक व जावक ची नोंद व अहवाल नियमित पणे तयार करणे.
  3. बँक स्टेटमेंट: सर्व बँक खात्यांच्या घेवाण देवाणी ची अचूक नोंद ठेवणे, ब्यालंस मिळवून घेणे.
  4. रिपोर्ट / अहवाल संदर्भात: बिल थकबाकी, स्टॉक अहवाल आणि मासिक जीएसटी रिपोर्ट / अहवाल तयार करणे. सी ए व कर सल्लागार यांशी संपर्क ठेवून योग्य कामे करणे.
  5. संवाद आणि सहभागीता: इतर कर्मचार्यांसोबत मन मिळावूपणे वागणे व कंपनी च्या प्रगती साठी प्रयत्न करणे. ग्राहक व्यापारींसह बाकी रक्कम वसूली बाबत स्पष्टपणे व योग्य संवाद साधणे.
  6. स्टॉक व्यवस्थापन: स्टॉकची स्थिती, मूल्यमापन करणे आणि अनुरूप कारवाईंचे प्रस्ताव सादर करणे.

योग्यता:

  1. लेखा, वित्त किंवा संबंधित क्षेत्रातील स्नातक पदवी.
  2. ‘Busy’ सॉफ्टवेअरमध्ये अनुभव, कापड उद्योगामधील अनुभव असल्यास उत्तम.
  3. अकाउनटिंग सिद्धांतांची आणि पद्धतीची चांगली ओळख.
  4. मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि इतर मायक्रोसोफ्ट ऑफिस अॅप्लिकेशन्सची निपुणता.
  5. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये लेखी व तोंडी कौशल्य.
  6. तत्पर स्वभाव, व्यवस्थापन कौशल्य, संघटनेत सहकार्य करण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता.

 

To apply for this job please visit arihantmills.in.

Scroll to Top