Website Arihant Corporation
Textile Manufacturer
अकौंटंट
अरिहंत कॉर्पोरेशन इचलकरंजी मधील अग्रगण्य टेक्सटाईल उत्पादक कंपनी आहे. आम्ही मुख्यत: कॉटन साड्या, रुमाल व धोती चे उत्पादन करतो. आमच्या टीम मध्ये जोडण्यासाठी आम्ही सध्या एक पात्र अकौंटंट शोधत आहे. उम्मेदवार हा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये निपुण असावा, आणि त्याला किमान ३ वर्षांचा ‘बीजी’ Busy या अकौटिंग सोफ्टवेअर मध्ये अनुभव असावा. सदर पदासाठी कार्यस्थळ हे 8/804, अरिहंत मनोर, शांतिनगर, इचलकरंजी असेल.
कार्यकाळ:
या पदासाठी कार्यकाळ खालीलप्रमाणे असेल:
सोमवार ते शनिवार: सकाळी 9:00 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 3:00 ते रात्री 8:30.
रविवार: विराम. (कधीतरी जर खूप काम बाकी असेल तर आम्ही अर्धा दिवस कार्यकाळ ठेवू शकतो.)
💰 वेतन (Salary):
-
₹20,000 से ₹35,000 प्रति माह
-
वेतन कौशल, अनुभव और कार्यक्षमता के आधार पर तय किया जाएगा
-
इंटर्नशिप / प्रशिक्षण अवधि के दौरान वेतन कम हो सकता है, जिसे कन्फर्मेशन के बाद संशोधित किया जाएगा
कामाचे विवरण / जबाबदारी:
- वित्तीय व्यवहार संदर्भात : सर्व वित्तीय घेवाण देवाणी ची अचूक नोंद ठेवणे आणि कंपनीच्या धोरणांनुसार बीजी सोफ्टवेअर मध्ये सर्व एन्ट्री करणे.
- मालाच्या व्यवहार संदर्भात : सप्लायर / कारखानदार कडून आलेले ग्रे कापड, प्रोसेसमधून परत आलेल्या मालाचा पूर्ण अहवाल, वेळोवेळी रिपोर्ट मध्ये भरणें. मालाची सर्व प्रकारची आवक व जावक ची नोंद व अहवाल नियमित पणे तयार करणे.
- बँक स्टेटमेंट: सर्व बँक खात्यांच्या घेवाण देवाणी ची अचूक नोंद ठेवणे, ब्यालंस मिळवून घेणे.
- रिपोर्ट / अहवाल संदर्भात: बिल थकबाकी, स्टॉक अहवाल आणि मासिक जीएसटी रिपोर्ट / अहवाल तयार करणे. सी ए व कर सल्लागार यांशी संपर्क ठेवून योग्य कामे करणे.
- संवाद आणि सहभागीता: इतर कर्मचार्यांसोबत मन मिळावूपणे वागणे व कंपनी च्या प्रगती साठी प्रयत्न करणे. ग्राहक व्यापारींसह बाकी रक्कम वसूली बाबत स्पष्टपणे व योग्य संवाद साधणे.
- स्टॉक व्यवस्थापन: स्टॉकची स्थिती, मूल्यमापन करणे आणि अनुरूप कारवाईंचे प्रस्ताव सादर करणे.
योग्यता:
- लेखा, वित्त किंवा संबंधित क्षेत्रातील स्नातक पदवी.
- ‘Busy’ सॉफ्टवेअरमध्ये अनुभव, कापड उद्योगामधील अनुभव असल्यास उत्तम.
- अकाउनटिंग सिद्धांतांची आणि पद्धतीची चांगली ओळख.
- मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि इतर मायक्रोसोफ्ट ऑफिस अॅप्लिकेशन्सची निपुणता.
- मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये लेखी व तोंडी कौशल्य.
- तत्पर स्वभाव, व्यवस्थापन कौशल्य, संघटनेत सहकार्य करण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता.
To apply for this job please visit arihantmills.in.